24.9 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

चारचाकी व रिक्षाचा अपघात ; चार जण जखमी

मालवण : चारचाकी व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले. हा अपघात शहरातील सागरी महामार्गावर दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात झाली नव्हती. कुडाळ वेतोरे येथील रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम (वय-५५) हे आपल्या रिक्षा मधून इशांत भालचंद्र नागवेकर, वर्षा भालचंद्र नागवेकर (वय-५१) व भालचंद्र नारायण नागवेकर (वय-५६) या तीन प्रवाशांना घेऊन कुडाळ बिबवणे येथून मालवण कांदळगाव येथे जात असताना देवगडवरून कुंभारमाठच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी चालकाने रिक्षाच्या मध्यभागी उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा नजीकच्या मळ्यात कोसळली. रिक्षा चालक व प्रवासी खाली कोसळले. यातील वर्षा नागवेकर या महिलेला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी रिक्षामधील प्रवाशांना बाहेर काढले व मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमींवर डॉ. अतुल महादळे, डॉ. अहमद यांनी उपचार केले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार, महादेव घागरे, शरद गुहाटे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!