कोल्हापूर | यश रुकडीकर : सध्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी अनेक मोठे नेते कोल्हापूर दौरा करत आहेत.ह्या दौऱ्यावेळी नेत्यांचा ताफा जायला रस्ता रिकामा केला जातो.ह्या काळात वाहनचालक खास करून दुचाकीस्वार भलतेच त्रस्त होतात.वाहनांच्या लांबच-लांब रांगांमधून वाहन पुढे नेताना मोठी कसरत करावी लागते.कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था तर सर्वांना माहितेय; खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा अशा कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून प्रवास करताना कोल्हापुरकरांच्या नाकीनऊ येतात इतकं मात्र नक्की.त्यातच मागच्या 3 दिवसात पुन्हा आगमन केलेला पाऊस.ट्रॅफिकमधे अडकलेल्या प्रत्येकाला हा पाऊस चांगलाच भिजवून जातो.अचानक येणाऱ्या मोठ्या पावसाच्या सरी,रस्त्यातील खड्डे आणि भरपूर ट्रॅफिक यासर्व गोष्टीत कोल्हापूरकर मात्र हैराण आणि हतबल झाल्याचं चित्र सध्या जिल्ह्याच्या शहरी भागात दिसत आहे.