आशिये ग्रामपंचायतच्या वतीने चेष्मा वाटप कार्यक्रम ; गावातील ५० जणांना चेष्मा वाटप
कणकवली : आमचे नेते खा. नारायण राणे यांनी आम्हा कार्यकर्त्यांना समाजात काम करताना नेहमी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तळमळ ठेवावी ,अशी शिकवण दिली आहे.त्यानुसार सामाजिक बांधिलकी जोपासत सरपंच महेश गुरव यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चेष्मा वाटप हा उपक्रम घेतला.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आशिये ग्रामपंचायतचा हा लोकाभिमुख उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.
आशिये ग्रामपंचायतच्या वतीने ५० नागरिकांना मोफत चेष्मा मोफत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर , सरपंच महेश गुरव, मालवणी कवी विलास खानोलकर, माजी सरपंच शंकर गुरव, बाळा बाणे, संजय बाणे, सत्यवान धुरी, सुनील बाणे, प्रवीण पावसकर, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, कर्मचारी दुर्वा जाधव, अंकिता कदम आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते .
संदेश सावंत म्हणाले, आ.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते काम करतो, खा.नारायण राणे, आ. नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीचे माध्यमातून आशिये गावचा विकास सुरु आहे. आशिये गावच्या विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत.काही कामे सुरु आहेत.त्यासाठी महेश गुरव यांना सरपंच पदाची जबाबदारी दिली, कारण या गावाच्या विकासाचा आलेख हलता राहिला पाहिजे. या कार्यक्रमाला आल्यानंतर अत्यंत आनंद झाला, कारण सिंधुदुर्ग पोलीस भरतीमध्ये या गावातील एक तरुण भरती झाला आहे. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या तरुणांनी मेहनत केल्यानंतर शंभर टक्के आपण पुढे जाऊ शकतो, हे निश्चित आहे. नाट्य क्षेत्रातही येथील कलाकार काम करत असल्याबाबत आम्हाला अभिमान आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर म्हणाले, सरपंच महेश गुरव यांनी यापूर्वी उपसभापती पद भूषवले आहे,त्यांचा दांडगा अभ्यास असल्याने प्रशासनावर वचक आहे,त्याचा फायदा लोकांना होत आहे.आशिये गावातील नागरिकांना चेष्मा वाटप झाले,ही बांधिलकी जपण्याचे काम महेश गुरव करीत आहेत.केवळ गावात नव्हे तर आमच्या खारेपाटण पर्यंत प्रत्येक ग्रामस्थांची काळजी घेण्याचे काम महेश गुरव करतात.रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आम्ही रुग्ण पाठवल्यावर एक फोन केल्यावर धावून महेश गुरव नेहमी जातात.आपल्या गावातील विकास कामांसाठी आग्रहाने भांडणारे महेश गुरव आहेत . त्याच बरोबर गावचे भूषण असलेल्या पोलीस आणि कलाकार,विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मारण्याचे काम केलं जात आहे,ही अभिमानाची बाब आहे.
मालवणी कवी विलास खानोलकर म्हणाले, आशिये ग्रामपंचायत वतीने विकासापलिकडे सामाजिक चळवळ उभारण्याचे काम महेश गुरव करीत आहेत.माणसाच्या जीवनात डोळा अवयव कमी होणे हे मनुष्याला त्रासदायक आहे.सरपंच महेश गुरव यांनी ही लोकांची गरज ओळखून घेतलेला उपक्रम लोक हिताचा आहे,आम्ही त्याचे कौतुक करतो.