1.7 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोराने मारला डल्ला 

सावंतवाडी : कोल्हापूर ते सावंतवाडी असा एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या ओटवणे येथील अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र एका अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी सीसीटीव्ही च्या माध्यमातून संबंधित चोरट्याचा शोध घेत आहेत येत्या काही दिवसातच संबंधित त्याला जेरबंद करू अशी माहिती पोलीस यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की ही घटना काल पहाटे साडेतीन वाजता घडली. दीक्षा दशरथ शृंगारे (वय ३७) असे तिचे नाव आहे. याबाबत तिने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात तब्बल १ लाख २० हजार रुपयाचे मंगळसूत्र असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार आज अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटवणे येथे राहणाऱ्या दिक्षा शृंगारे काही कामानिमित्त कोल्हापूर येथे गेल्या होत्या. तेथून २९ तारखेला रात्री उशिरा कोल्हापूरहून सकाळी ६ वाजता त्या सावंतवाडी बस स्थानकावर पोचल्या.

यावेळी त्यांना आपल्या गळ्यात असलेले मंगळसूत्र दिसले नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान आपण झोपले असल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरी केल्या असल्याचा त्यांचा संशय आहे. त्यानुसार त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आपली तब्येत ठिक नसल्यामुळे आपण एक दिवस उशिरा येऊन तक्रार दिल्याचे फिर्यादी शृंगारे यांचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!