फणसगाव येथील वीज चोरीला पाठीशी घालणाऱ्या अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा देवगड शहर भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक चाकरमानी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत असतात या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घ्या अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी आज महावितरणच्या तक्रार निवारणानिमित्त आयोजित केलेल्या ग्राहक बैठकीत केल्या.
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये देवगड तालुक्यातील महावितरण चे ग्राहक सरपंच यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी बोलताना वरील सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे फणसगाव परिसरामध्ये झालेल्या वीज चोरी बाबत दुर्लक्ष करणाऱ्या अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या कोणत्याही परिस्थितीत वीज चोरी खपवून घेऊ नका असा सल्लाही त्यांनी बैठकीत दिला.
आजच्या बैठकीमध्ये घरावरून येणारा विद्युत वाहिन्या, पोल शिफ्टिंग, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गंजलेले पोल बदलणे तसेच शेती जमिनीत असलेले पोल बदलणे याची मागणी गावोगाव असलेल्या सरपंच व वीज ग्राहकाने केली. आमदार नितेश राणे यांनी याबाबत आराखडा बनवून तातडीने पोल बदलण्याचे काम हाती घ्या अशा सूचना दिल्या आहेत.
गावातील स्ट्रीट लाईटचे बल्ब बदलण्यासाठी वायरमन पैसे मागतात अशी तक्रार बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी केली. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत योग्य आपण निर्णय घेऊ अथवा लेटेस्ट परिपत्रक असेल ते पाठवून देऊ असे कार्यकारी अभियंता माळी यांनी सांगितले.
शहरातील समस्या योगेश चांदोसकर,तनवी चांदोसकर व दिनेश पटेल, राजा भुजबळ यांनी मांडल्या. देवगड मध्ये दोन अधिकारी व एक वायरमनची बदली करण्यात आली मात्र बदली असलेली माणसे या ठिकाणी आली नाहीत यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तातडीने या ठिकाणी माणसे नेमा अशी मागणी ही आमदार नितेश राणे यांच्यासमोर वीज अधिकाऱ्यांकडे केली. आमदार नितेश राणे यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत देवगड शहर मध्ये पर्यटक व चाकरमानी मोठ्या प्रमाणात येतात. कामाचा लोड असतो. ही माणसे तातडीने नेमा असे आदेश दिले आहेत. कुणकेश्वर येथे जाणाऱ्या फिडरवरच देवगड शहरातील खाक्षीवाडी असून तातडीने त्यासाठी वेगळ्या सेक्शन करा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. या मागणीनुसार स्वतंत्र लाईन आता झाली असून ती लवकरच प्रभावित करण्यात येईल. अशी माहिती वीज वितरण च्या अधिकाऱ्याने दिली. शिवसेना नेते विलास साळसकर यांनी बोलताना. फणसगाव येथील विज चोरी बाबत सविस्तर मांडला विविध चोरी बाबत सॉफ्ट कॉर्नर घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी अजित राणे, पंकज दूखंडे, विश्वनाथ खानविलकर, विजयदुर्ग चे माजी सरपंच श्री सारंग, संतोष किंजवडेकर, अमित कदम, महेश राणे यांनी या समस्या मांडल्या. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटे, महेश नारकर, तालुका प्रभारी संतोष किंजवडेकर, डॉ अमोल तेली, महावितरण चे सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.