15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

सांबराच्या शिकार प्रकरणीदोघांना अटक ; दोघे फरार

शिकारीसाठी १४ जण पाटयेत गेल्याची वन विभागाची माहिती

दोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रातील पाटये गावात शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या चौदा जणांपैकी दोघांना सांबराच्या मांसासह ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या सोबतचे दोघेजण फरार झाले आहेत.

दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी धरण क्षेत्रातून आत असलेल्या पाटये गावच्या हददीत १४ जण गेल्याची गोपनीय माहिती वनरक्षक सूर्यभान गिते यांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने श्री गीते व कोनाळ तपासणी नाका वनरक्षक तत्काळ घटनास्थळी गेले असता सकाळी साडेदहाच्या दरम्यान तिलारी धरणातून एका बोटीमधून प्रवास करून चौघेजण धरणालगत बोटीच्या थांब्याच्या ठिकाणी आले. यावेळी दोघे वनरक्षक या बोटीची व त्यातील व्यक्तीची तपासणी करण्याकरीता गेले असता त्यातील दोघेजण अपु-या मनुष्यबळाचा गैरफायदा घेऊन दुचाकीने फरार झाले व तर दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे वन्यप्राणी सांबराचे मांस आढळले. वनविभागाने पकडलेल्या दोघांची नावे साईनाथ प्रभाकर नाईक व अनिल गोविंद नाईक ( दोघेही रा. पाटये पुनर्वसन वसाहत , सासोली ता. दोडामार्ग) अशी आहेत तर फरार संशयिताचे नाव समीर पांडुरंग गवस असल्याचे कळले.त्याच्यासोबत त्याचे कामगार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

त्यांचेकडे वन्य प्राणी सांबर याचे मांस आढळल्याने पकडलेल्या दोघा व दोघा फरार संशयित आरोपीवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारीत २०२२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेडडी, यांच्या मार्गदर्शनाखालो सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) वैभव बोराटे,दोडामार्ग वनक्षेत्रपाल अमित कटके, कोनाळ वनपाल किशोर जंगले, वनपाल (फिरते पथक ) मधुकर काशिद, वनरक्षक (फिरते पथक) प्रमोद जगताप, वनरक्षक (पाटये) सुर्यभान गिते, कोनाळ तपासणी नाका वनरक्षक गणेश भोसले व अजित कोळेकर, वाहन चालक नितिन सावंत, मदतनीस नितेश देसाई यांच्या पथकाने केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!