कणकवली : तळेरे येथे महिलांसाठी मोफत अगरबत्ती प्रशिक्षण संपन्न ग्रामपंचायत तळेरे व स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने तळेरे येथे महिलांसाठी एक दिवशीय अगरबत्ती प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रशिक्षक रश्मी दाभोलकर यांनी अगरबत्ती निर्मितीच्या विषयीची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत या उद्योगातील व्यावसायिक संधींची महिलांना माहिती दिली. महिलांनी प्रत्यक्ष सहभागी होत प्रशिक्षण जाणून घेऊन अगरबत्तींची निर्मिती केली. एकूण 55 महिलांनी ह्या प्रशिक्षणात भाग घेतला होता.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन सत्यवती वळंजु जयवंती वळणजू दिप्ती तळेकर सुरेश भाऊ तळेकर देवकी तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर उपसरपंच रिया चव्हाण यांचे मोलाचं सहकार्य लाभले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पुनम महाडिक व श्रुती कल्याणकर आदी महिलांनी मेहनत घेतली.
अशा प्रकारची प्रशिक्षणातून महिलांना व्यवसायभिमुख सक्षम बनवून आर्थिक सबल करण्यावर भर असेल असे मत समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्गचे सचिव कमलेश गोसावी यांनी व्यक्त केले.