अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
सिंधुदुर्ग : मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्याच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम के गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डि. सावंत, राष्ट्रवादी व्ही. जे. एन. टी. जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, जिल्हा सचिव सुशील चमनकर, कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, कणकवली राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर चिटणीस गणेश राऊळ ले, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, सौ. ऋतुजा शेटकर, व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष आशिष कदम, वैभव वाडी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, देवगङ जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, जिल्हा सचिव केदार खोत, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीत अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारण्यात येत नाही या घटनेचा निषेध व्यक्त करावा तेवढा कमीच आहे ही घटना क्लेशदायक व संताप आणणारी आहे पुतळ्याच्या स्थापनेपासून केवळ आठ महिन्यात पुतळा पडणे ही बाब अनाकलनीय आहे या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणी मध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणे करून असे निकृष्ट काम करण्याची हिम्मत कोणाला होणार नाही.
तसेच पुढील काळात राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्रचे आराद्य दैवत युगपुरुष व भारतीय नैदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व दैदिप्यमान शैर्याचा इतिहास सांगणारे स्मारक शक्तिशाली पुतळ्या च्या रूपात उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.