15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

एमटीडीसीच्या नावाखाली अनैतिक धंदे करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकावर गुन्हा दाखल करा

निरवडेतील ग्रामस्थांची मागणी : पोलिसांना निवेदन

एमटीडीसीचा परवाना रद्द करण्याचीही मागणी 

सावंतवाडी : एमटीडीसीच्या बॅनरखाली निरवडे गावात अनैतिक धंदे करून तरुणाईला बिघडवण्याचे काम करणाऱ्या निरवडे येथील “त्या” हॉटेल व्यवसायिकावर गुन्हा दाखल करा,तसेच एमटीडीसीने दिलेला परवाना रद्द करा,अन्यथा यापुढे असे प्रकार घडल्यास होणार्‍या घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा निरवडे येथील ग्रामस्थांनी आज पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना दिला.

दरम्यान, निरवडे येथील एमटीडीसीच्या बॅनर खाली हॉटेल व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीकडून अनैतिक धंदे राजरोजपणे सुरू आहेत.वेंगुर्ले तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेनंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

निरवडे येथील ग्रामस्थांनी आज सावंतवाडी पोलिसांना याबाबतचे निवेदन दिले.यावेळी सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे,सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे,निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते नयनेश गावडे,शिवाजी गावडे,आनंद पांढरे,दत्ताराम गावडे, सुनील माळकर आदी उपस्थित होते.

निरवडे येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,निरवडे माळकरवाडी येथे एमटीडीसीच्या बॅनर खाली हॉटेल व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीकडून गेले काही दिवस अनैतिक धंदे राजरोसपणे सुरू आहेत. येथील एका युवकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.हा प्रकार निरवडे येथील त्याच हॉटेलमध्ये घडला आहे.गेले काही दिवस हे हॉटेल बेकायदेशीर धंद्यासाठी चर्चेत आहे.त्यामुळे बाहेरून येऊन गावात स्थायिक झालेल्या त्या व्यक्तीकडून निरवडे सारख्या सुसंस्कृत गावाची बदनामी सुरू आहे आणि याचा नाहक त्रास निरवडेवासियाना सहन करावा लागत आहे. तर कदापिही गावाची होणारी बदनामी सहन करणार नाही.त्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक अनैतिक प्रकार होत असल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.मात्र वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्याकडे संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे या प्रकरणात संबंधित हॉटेल चालकाची चौकशी करून त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

तसेच या प्रकरणात संबंधित व्यक्ती गेले अनेक दिवस गावातील तरुणाईला बिघडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधिताचे हाॅटेल आणी एमटीडीसीकडून दिलेला परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ वरिष्ठ स्तरावर दाद मागू. असाही इशारा यावेळी उपस्थित त्यांनी दिला. दरम्यान संबंधित हॉटेल चालकाची चौकशी करून निश्चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले. निरवडे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात प्रमोद गावडे, सुहास गावडे, वासुदेव गावडे, संतोष गावडे, विनय गावडे, राजन गावडे, भूषण बांदिवडेकर, संजय तानावडे, कृष्णा बांदिवडेकर, रमेश पांढरे यांच्यासह १२० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!