६ ते २० सप्टेंबर कालावधी प्रवास
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्ग व मुंबई वासियांसाठी खुशखबर आहे. अलायन्स एअर कंपनीने गणेशोत्सव कालावधीसाठी अतिरिक्त विमान सेवा वाढविली असल्याने मुंबई येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून परत मुंबईला जाणाऱ्या गणेश भक्तांना त्याचा फायदा होणार आहे.
अलायन्स एअर कंपनीने ही अतिरिक्त विमानसेवा गणेशोत्सव कालावधीत वाढवली आहे साध्या रेल्वे बुकिंग फुल झाली आहेत, त्यामुळे प्रवाशांना ही नवीन संधी उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सव निमित्ताने ६ सप्टेंबर २०२४ पासून २० सप्टेंबर २०२४ पर्यंत ही अतिरिक्त विमान सेवा सिंधुदुर्ग मुंबई ते सिंधुदुर्ग मुंबई अशी राहणार आहे.
आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असे तीन दिवस ही विमान फेरी सकाळी मुंबई वरुन ७.०५ ला सुटून ८.३० वाजता सिंधुदुर्ग येथे पोहचणार आहे. तर हेच विमान सिंधुदुर्ग वरुन सकाळी ९.०० वाजता सुटून १०.३५ वाजता मुंबई येथे पोहचणार आहे, अशी माहिती अलायन्स एअर कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईट वर दिली आहे. गणेशोत्सव साठी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्या प्रवाशांसाठी यामुळे फायदा होणार आहे.