10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

संघर्ष करायला आलो नव्हतो तरीही भाजपच्या चिंधीचोरांनी गोंधळ घातला – आदित्य ठाकरे

महाविकास आघाडीच्या सभेत सत्ताधाऱ्यावर जोरदार आरोप…   

मालवण : शिवपुतळा उभारणीत झालेला भष्ट्राचार लपविण्यासाठी भाजपाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यासमोरच बालिशपणा संपूर्ण जगाने पाहिला. भाजपची झुंडशाही संस्कृती यातून दिसली. आम्ही संघर्ष करायला आलो नव्हतो, असे असतानाही भाजपच्या चिंधीचोरांनी गोंधळ घातलाच. यामुळे राज्यात कार्यरत असणाऱ्या मिंदे सरकारला हद्दपार करण्याची त्यांच्या डोळ्यात डोळे घालून लढण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. भष्टाचारातून आलेल्या पैशांतून याठिकाणी लोकसभा निवडणूक जिंकण्यात आली आहे. आता जनतेला भाजपाचा खरा चेहरा दिसून आला आहे. महाराजांच्या पुतळ्यालाही यांनी सोडले नाही. पुतळा कोसळणे ही घटना दुदैवी आणि आमच्या अस्मितेशी संबंधित असल्याने आम्ही यासाठी सदैव लढण्यासाठी तयार आहोत असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. येथे महाविकास आघाडीकडून आयोजित केलेल्या जनसंताप मोर्चाला श्री. ठाकरे म्हणाले, मुंबई मेट्रो, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई महापालिका तसेच राज्यातील समोर आलेल्या अनेक भष्ट्राचारावर भाष्य करत दिल्लीसमोर झुकणारे, मिंदे, खोकेबाज सरकार हद्दपार करण्याची वेळ आली आहे. भाजपाने जे जे उभे केले आहे, त्याला गळती लागली आहे. महाराजांच्या पुतळ्यातही भष्ट्राचार झाला असून त्यातील दोषींवर कारवाई व्हायला हवी . अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारण्याची परवानगी कशी देण्यात आली? कोण आहे हा आपटे? त्याला पसार होण्यासाठी शासनाने मदत केली आहे काय? टेंडरसाठीच पुतळा उभारण्यात आला होता काय? आता या सरकारला याच मातीत गाडण्याची वेळ आली आहे. भाजप सरकार आता अंगावर येणार आहे. ईडी, सीबीआयची भिती घालून विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल, पण आता आम्ही गप्प बसणार नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही. दिल्लीत जावून फक्त राजकारण करण्यात त्यांना रस आहे. आमचा जन्म झुकण्यासाठी झाला नाही, आम्ही लढत राहणार आहोत. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेने आम्हाला चिड आली आहे. आमच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. याला स्वाभिमानानेच उत्तर दिले पाहिजे, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती, नौदलाकडे बोट दाखवून त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. पुतळा वाऱ्यामुळे कोसळला असे म्हणत असतील तर त्यादिवशी एकही झाड मालवणमध्ये कोसळले नव्हते, फक्त पुतळ्याच्याच परिसरात वारा झाला का? असा प्रश्न करत मुख्यमंत्र्यांचे उत्तर योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. राज्यातील सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. आज दोन विरोधी पक्षनेते उपस्थित असताना राजकोट किल्ल्यावर राजकीय संर्घषाची घडलेली घटना दुदैवी आहे. याबाबत आम्ही योग्य त्याठिकाणी बोलणार आहोत. या सरकाराच्या झुंडशाहीला जनताच उत्तर देणार असून विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची वाईट परिस्थिती दिसून येईल. पुतळा दुर्घटनेला जाब सरकारला विचारायला हवा. याठिकाणी लोकशाही आहे की ठोकशाही हेही लवकरच समजून येईल, असे विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नेहरू, गांधी यांच्या काळात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे आजही उभे आहेत. मात्र मोदींच्या राज्यात उभे राहिलेले पुतळे कोसळत असल्याने या सरकारलाही कोसळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावण्याचे काम या सरकारने केले आहे. इव्हेंट करण्यासाठी राजकोटमध्ये पुतळा उभा केला होता. लोकसभा निवडणुकीत महाराजांच्या नावावर मते घेण्यात आली होती. सुदैवाने पुतळा शिवप्रेमी असताना पडला नाही, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. महाराजांनाच हे सरकार थांबवायचे नाही यामुळे आता सरकारला जाण्याची वेळ आली आहे. आमच्या अस्मितेचे रक्षण ते करू शकत नसल्याने त्यांना बाहेरचा रस्ताच दाखविण्यात येणार आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये वाचाळविरांची गर्दी झाली आहे. वाचाळवीर आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. या सर्वांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. छत्रपतींचे राज्य यावे हिच श्रींची इच्छा आहे. यामुळे राज्य सरकारच्या भष्ट्राचाराची पोलखोल पुतळा दुर्घटनेतून समोर आली आहे. आता कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या सरकारला बाजूला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. राज्य शासनाकडून नौदलाची बदनामी केली जात आहे. पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाचीही जबाबदारी महत्वाची होती. पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. यामुळे याप्रकरणी चौकशी व्हायला हवी. असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तौक्ते चक्रीवादळ झाले तर किल्ले सिंधुदुर्गाच्या तटबंदीचा एकही दगड हलला आहे आणि शिवपुतळा वाऱ्यामुळे कोसळला म्हणण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांचे होते तरी कसे? चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळेच पुतळा कोसळला असल्याने यात दोषींना कडक शासन व्हायला हवे. पुतळा उभारण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्ला ठेकेदार हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मुलाचा लाडका ठेकेदार असल्याने त्याला काम दिले होते, असा आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केला. महाराजांचा अपमान करण्याचे कृत्य या शासनाने केले असून शिवप्रेमी कधीही गप्प बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही सनदशीरपणे मोर्चा काढत असताना भाजपच्या मंडळींनी ठोकशाही करण्याचा प्रयत्न केला आहे. पुतळा उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाला असून यात दोषी असणाऱ्या सर्वांना कारवाई झाली पाहिजे. मोदींना खूश करण्यासाठी उभा केलेला पुतळा चुकीच्या पद्धतीनेच उभा केल्याने आज ही नामुष्की ओढविली आहे. यावर भाजप मंडळी आपली चूक लपविण्यासाठी दुसऱ्यांच्या माथी खापर फोडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या घटनेने शिवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून यातील दोषींना धडा शिकविला जाणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र लुटण्याचे काम भाजप मंडळी करत आहेत. याच पैशांतून लोकसभा जिंकण्यात आल्याने पालकमंत्र्यांना वाचविण्याचे काम काही मंडळी करताना दिसत आहेत. बेताल वक्तव्ये करत भाजपची लोकं पुतळ्याच्या भष्ट्राचारात सहभागी असणाऱ्या लोकांना वाचविण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्री यांची भाषा तर अशोभनीय अशीच आहे. राज्य शासन यातून पळू शकणार नाही. आता राजकोट याठिकाणी जनतेच्या पैशांतूनच पुतळा उभा केला जाईल. यासाठी मी एक लाख रूपये देत आहे, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!