9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

वैभववाडीच्या विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी असेच एकत्र येऊया – आमदार नितेश राणे

आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला वैभववाडीवासियांची अलोट गर्दी 

सुप्रसिद्ध सिने अभिनेते आदिनाथ कोठारे यांची उपस्थिती कार्यक्रमाचे ठरले आकर्षण

वैभववाडी : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने जसे आज वैभववाडीतील सर्वजण एकत्र आलात त्याच पद्धतीने वैभववाडीच्या विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे केले.

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे पुरस्कृत व वैभववाडी भाजपा आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व रसिकांच्या अलोट गर्दीत पार पडला. सुप्रसिद्ध सिने अभिनेते आदिनाथ कोठारे यांची उपस्थिती प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरले. आदिनाथ कोठारे यांनी देखील प्रेक्षकांशी संवाद साधत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे सिने अभिनेते आदिनाथ कोठारे यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आमदार नितेश राणे यांचा देखील वैभववाडी भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, वैभववाडी तालुक्याच्या नावातच वैभव आहे. इथली जनता अगदी जीवाला जीव देणारी आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला निश्चित अभिमान आहे. आज या उत्सवाला ज्या ताकतीने माझे वैभववाडीवासिय एकत्र आलेत. हे पाहून खूप समाधान वाटले. वैभववाडीच्या विकासासाठी व भविष्यासाठी अशीच ताकद द्या असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे केले. तसेच आपले सर्व सण सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन यापुढेही साजरे करूया असे आ. राणे यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर येथील तुफान ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. कलाकारांनी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. संभाजीनगर गुरववाडी गोविंदा पथक खारेपाटण या पथकाने सहा थराची सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच गोपाळनगर गोविंदा पथक वैभववाडी, एडगांव गोविंदा पथक व बॉडी बिल्डर गोविंदा पथक यांनी सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, विजय तावडे, राजेंद्र राणे, मिलिंद मेस्त्री, प्राची तावडे, नेहा माईणकर, सज्जन काका रावराणे, अतुल सरवटे व मोठ्या संख्येने भाजपा सभापती , नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन लांजेकर, भालचंद्र साठे व संतोष हरयाण, बंड्या मांजरेकर यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!