तज्ञ पथकाकडून घटनेच्या सखोल चौकशीची मागणी
सिंधुदुर्गनगरी : मालवण येथे छत्रपतींचा पुतळा कोसळून झालेली घटना ही छत्रपतींच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार धरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. दरम्यान घाईगडबडीत पुतळा उभारून केवळ टेंबा मिरवण्याची घाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी जेष्ठ तज्ञ पथकाकडून करण्यात यावी, अशी ही मागणी त्यांनी केली आहे. याबाबत श्री. राऊत यांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक दिले आहे.