28.1 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

इस्लाम धर्मगुरूच्या विरोधात वक्तव्य करणार्‍या महाराजांवर कारवाई करा

सावंतवाडी मुस्लिम वेल्फेअरची मागणी ; सावंतवाडी पोलिस निरिक्षकांना निवेदन सादर

सावंतवाडी : इस्लाम धर्मगुरू महंमद पैगबंर यांच्या विरोधात वक्तव्य करणार्‍या रामगिरी महाराज यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. संबंधित महाराज हे जाणीवपुर्वक अशा प्रकारची विधाने करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सावंतवाडी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सोसायटी चे सेक्रेटरी चाँद मैनुद्दीन करोल, उपाध्यक्ष रफिक मेमन, ट्रेझरर शफी उमर खान, सहा. चिटणीस आरिफ करोल, जमील शेख, मोहम्मद समेजा, मौलाना इलियाज, सलीम अकबानी, रझाक खान, इकबाल, इमाम हुसेन, सय्यद राजू शेख, तौसिफ कच्छि, तौसिफ आगा, शहाबास आगा, इलियास आगा, अझर रेशमी आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!