2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

गणेशोत्सव कालावधीत जनतेच्या समस्या सोडवा | शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची मागणी

कणकवली : गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताच्या रस्त्यांची दुरावस्था, विजवीतरण, एसटी बस फेऱ्या आणि मोबाईल नेटवर्क आदी महत्वाच्या प्रश्नांकडे शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत आवाज उठवला. ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले सरसकट खड्डे बुजविणे, रस्त्यालगत ची झाडी कापणे आदी बाबी बांधकाम विभागने तातडीने कराव्यात. रस्त्यावर खड्डा नसलेला दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी योजना बांधकाम विभागाला शाब्बासकी देण्यासाठी राबवणे गरजेचे आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेली अवजड वाहतूक बंदी गणेशोत्सव काळात घालणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग ला पश्चिम महाराष्ट्र शी जोडणारे अनेक घाट अद्याप नादुरुस्त आहेत. करूळ गगनबावडा घाटा मधून तर अद्यापही वाहतुक बंद आहे. विजवीतरण चा विजेचा लपंडाव सुरू आहे. यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला तर विजपुराठा ठप्प होता. विज नसल्याने गणेशमूर्तीकार अडचणीत येताहेत. व्यापारी विजेअभावी हतबल झाले आहेत. शहरी भागात खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरू केला जातो. मात्र ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा 24 तास उलटूनही दुरुस्त केला जात नाही.

आजही ग्रामीण भागातील अनेक एसटी बस फेऱ्या बंद आहेत. गणेशभक्त, चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी विभाग नियंत्रकानी बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या सुरू कराव्यात. एसटी बस स्थानिकांची तसेच बस स्थानकावरील सार्वजनिक शौचालये चांगली स्वच्छ ठेवावीत. जिल्ह्यात बी एस एन एल चे शेकडो टॉवर आहेत. मात्र त्यांचे नेटवर्क सुरळीत नाही. बी एस एन एल सह खाजगी कंपन्यांचे नेटवर्क गणेशोत्सव काळात तरी सुरळीत ठेवावेत अशीही मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!