2 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

कणकवली कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कणकवली : कणकवली कॉलेज, कणकवली येथे नोकर भरती कक्ष आणि कौशल्य विकास केंद्र यांचे मार्फत अशोक लेलँड (लकी व्हील प्रायव्हेट लिमिटेड) आणि ॲक्सिस बँक मधील विविध पदासाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या की, रोजगार आणि नोकरीच्या असंख्य संधी कौशल्य संपन्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचा सुशिक्षित युवक युवतीने विचार करावा. आपल्यामधील कमतरता शोधा व त्या भरून काढण्यासाठी प्रयत्न करा, आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना अशोक लेलँड रिजनल हेड श्री. युवराज कांबळे यांनी अशोक लेलँड व लकी व्हील प्रायव्हेट लिमिटेडमध्ये उपलब्ध संधी, तसेच विक्री क्षेत्रामध्ये करियर करत असताना कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपस्थित प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व कणकवली कॉलेज अशा प्रकारच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

सदर दिवशी 40 युवक युवतींनी अशोक लेलँड व ॲक्सिस बँकसाठी मुलाखती दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या नोकर भरती कक्ष व कौशल्य विकास केंद्र यांचे मार्फत प्रा. सुरेश पाटील, प्रा. डॉ. बाळू राठोड, प्रा. मंदार पडेलकर, प्रा अमरेश सातोसे, प्रा. सागर गावडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजु, पदाधिकारी सदस्य आणि प्राचार्य कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंज यांनी केले तर शेवटी आभार प्रा. अमरेश सातोसे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!