बांदा / ओटवणे : चंदगड वरून गोवा येथे पेपर रोल घेऊन जाणारा के ए २२ एए ३७९४ हा रामलिंग मसूरकर रा. चंदगड यांच्या मालकीचा कंटेनर बांदा गवळी टेम्ब येथे अपघात ग्रस्त झाला असून कंटेनर रस्त्याच्या बाजूने मारलेल्या चरात रुतून अपघातग्रस्त झाला. ही घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
बांदा गवळी टेम्ब येथील काही वर्षांपूर्वी रस्त्या बाजूला खोदून ठेवलेल्या चरात वाहन फसण्याचे प्रकार सूरू असून या घटनेत या चरात वाहन पूर्णतः फसल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी कोसलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.यात सुदैवाने वाहन चालक बचावला असला तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गात मारलेल्या चरामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाना याचा मोठा फटका बसत आहे.







                                    