देवगड : गेले महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर शुक्रवारपासून दमदार हजेरी लावली आहे. खोल समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . हवामान खात्याने २४ ऑगस्टपर्यंत वादळाचा इशाराही दिलेला आहे .
यामुळेच देवगड बंदरातही गुजरात डहाणू येथील मच्छीमारी नौका आश्रयासाठी गुरुवार व शुक्रवारपासून दाखल झाल्या आहेत.यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे किंजवडे डोबवाडी येथील अनंत झिलू घुमडे यांच्या घराच्या पडवीची भिंत कोसळून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्याने काहीशा उखाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. बळीराजा देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर काल दुपारपासून मान्सूनला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात खोलवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षित बंदर असलेल्या देवगड बंदरात गुजरात डहाणू रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील मच्छीमारी नौका आश्रयासाठी दाखल झालेले आहेत त्यामुळे देवगड बंद राहील मच्छीमार नौकांनी गजबजून गेले आहे. तालुक्यात १६१ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आतापर्यंत २७९० मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाडी येथील अनंत झिलू धुमडे यांच्या घराच्या पडवीची भिंत पडून त्यामध्ये सुमारे एक लाख रूपयेचे नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील येथे करण्यात आली होती.
दरम्यान किंजवडे डोबवाडी येथील घुमडे यांच्या घराची राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पाहणी केली असून शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी टेंबुलकर यांनी घूमडे यांना सांगितले.