16.1 C
New York
Wednesday, May 14, 2025

Buy now

वागदे येथे हॉटेल मालवणी जवळ अपघात ; कणकवली येथील दोन युवक ठार

कणकवली : येथील मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ पहाटे २ ते २:४५ वा. च्या सुमारास उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या  दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसल्याने या दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण ठार झाले. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत ( वय २४ ) व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत ( वय २३ ) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, संतोष शिंदे, यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!