15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा! 

प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांचे प्रतिपादन   

 त्रिंबक येथील तालुका स्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद                  

 मसुरे : आहारात रान भाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध असतात. विविध आजाराना दूर ठेवण्यासाठी आहारात या भाज्या आपण वापरणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांनी रानभाजी संवर्धन व त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत माहिती देताना केले. जनता विद्यालय त्रिंबक येथे तालुका कृषी अधिकारी व मालवण कृषि व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव,जनता विद्यालय अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्री हुसेन आंबर्डेकर,राजाराम चव्हाण व सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक बीटीएम.आत्मा उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव यांनी केले. रानभाजी मार्गदर्शक श्री.रामचंद्र शृंगारे यांनी रानभाजी चे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा घेण्यात आली.

पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती वर्षा जाधव, द्वितीय अंजली गोसावी, तृतीय अश्विनी गावडे, उतेजनार्थ प्रज्ञा माळगावकर,जयश्री त्रिंबककर याना बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन श्रीमती राणी थोरात व आभार सुशील शिंदे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!