जनता पार्टीच्या माध्यमातून कणकवली टेंबवाडी येथे २५ ऑगस्ट रोजी राबविणार
नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन परेश परब यांनी केले
कणकवली : राज्य आणि केंद्र सरकार कडून जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांची सखोल माहिती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी मदत न मिळाल्याने अनेक पात्र लाभार्थी सरकारच्या योजनांपासून वंचित राहतात. सरकारकडून या योजना योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जातात. तरी देखील काही लाभार्थी सरकारी योजनांपासून वंचितच राहतात.
सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीने नेहमीच सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असते. स्थानिक पातळीवर पक्षाकडून नागरिकांना मदत व्हावी यासाठी वेळोवेळी शिबिरांचे आयोजन केले जाते. असेच एक शिबिर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कणकवली शहरात आयोजित करण्यात आले आहे पक्षाच्या कणकवली तालुका बुथ क्रमांक २८९ च्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सरकारच्या लोकप्रिय वयोश्री योजना, लाडकी बहिण योजना व इतर योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना नोंदणी सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजले पासून टेंबवाडी येथील नागेश्वर मंदिराजवळील संतोष राणे यांचे घर, या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बुथ अध्यक्ष परेश परब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
संपर्क साधा – सागर राणे – ७८४१८७८४०६ शिशिर परुळेकर – ९४२२१४६१४६