माजी खासदार निलेश राणेंनी केले स्वागत
मालवण : भाजपा नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटाला मालवणात धक्का दिला आहे. कोळंब गावच्या सरपंच सिया धुरी यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
दरम्यान, निलेश राणे यांनी सरपंच धुरी यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले, गांव विकास हेच धोरण ठेवून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे गावात जास्तीत जास्त विकासनिधी देण्याची जबाबदारी आमची आहे. गांव विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. नुसती पत्रे आम्ही देणार नाही तर प्रत्यक्ष काम करू. ग्रामस्थांना अपेक्षित कोळंब गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सध्य स्थितीत गावच्या स्मशानभूमीसाठी आवश्यक्ष निधी खा. नारायण राणे साहेब यांच्या खासदार निधीतून तात्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही ही निलेश राणे या निमित्ताने दिली. यावेळी सरपंच सिया धुरी म्हणाल्या, दीड वर्षे सरपंच म्हणून काम करताना अडचणी आल्या, समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे गावाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करत असून भाजपा नेते निलेश राणे यांनी गांव विकासाचा व जास्तीत विकासनिधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवेशकर्ते सरपंच सिया धुरी यांसोबत परमानंद कदम, चंद्रकांत धुरी, कांचन धुरी, सुनील परब, प्रीती परब, प्राजक्ता परब, वेदिका परब, दिपिका कदम, स्वप्ना कदम कमलाकर कदम, मानसी धुरी, सुषमा परब, रवींद्र परब, रविना परब, चेतन धुरी, मारुती पवार, प्रिया पवार, ओंकार परब, अक्षय कदम, साहिल परब आदी नी सरपंच सिया धुरी यांसोबत भाजपात प्रवेश केला. भाजपा मालवण कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदीविक्री संघ तालुकाध्यक्ष राजन गांवकर, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, दाजी सावजी यांसह अन्य पदाधिकारी तसेच माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल निव्हेकर, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश चव्हाण, विजय ढोलम, भाऊ फणसेकर, उज्वला करलकर, संदीप भोजने, भाऊ लाड, भाई ढोलम, सत्यवान लोके, विजय सारंग, शरद लोके, प्रसाद कामतेकर, बबन मलये, गोपाळ बागवे, दिनेश कोरगावकर, दीपक कोरगावकर, उमेश चव्हाण, संजय धुरी, तातोबा करलकर, सुशांत भोजने, हनुमंत धुरी, गणेश पेडणेकर, सचिन नरे, मंगेश कांदळगावकर उपस्थितीत होते. सर्व उपस्थितांचे धोंडी चिंदरकर यांनी आभार मानले. ऑक्टोबर मध्ये पुन्हा आपलेच सरकार भाजपा हा महासागर पक्ष आहे. केंद्रात आपले सरकार आहे. खासदार आपले आहेत. तर राज्यात आपले सरकार असून पुन्हा आपलेच सरकार ऑक्टोबर मध्ये येणार आहे. त्यामुळे गतिमान विकास सुरूच राहणार आहे. असे निलेश राणे यांनी या निमित्ताने सांगितले.