-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

तळवडेतील अपहाराशी शिवसेनेचा व केसरकरांचा काही संबंध नाही; सुरज परबांचा दावा

ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्हीच मागणी करणार…

सावंतवाडी : तळवडे झालेल्या अपराशी शिवसेनेचा आणि मंत्री दीपक केसरकरांचा कोणताही थेट संबंध नाही. फक्त “फॅन फॉलोवर” वाढवण्यासाठी त्यांच्यावर काहीजण टीका करत आहेत. मात्र आमच्यावर त्याचा फरक पडत नाही. उलट ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका तळवडे येथील ग्रामस्थांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान या ठिकाणी झालेल्या अपहारात पोट ठेकेदार म्हणून आरोप करणारेच काम करत असतील त्यामुळे त्यांना बोलण्याची नैतिकता नाही. इतके दिवस अपहार झाला मग ग्रामपंचायत सदस्य असताना नेमके तुम्ही काय केलात? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तळवडे येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराबाबत भाजपच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते.

या टीकेला उत्तर देण्यासाठी तळवडे ग्रामस्थांनी आज पत्रकार परिषद घेतले. यावेळी सुरेंद्र परब, जालिंदर परब, सुरज डिचोलकर, बबन जाधव, बाळा सामंत, दिवाकर गावडे, रोहित परब, महेश परब आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!