2.4 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

खारेपाटण युवासेना विभागप्रमुख पदी निखिल गुरव यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज खारेपाटण युवासेना विभागप्रमुख पदी निखिल गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते निखिल गुरव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी युवासेना विभागप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खारेपाटण विभागमध्ये 9 ते 10 गाव येतात. या संपुर्ण विभागाची जबाबदारी आता निखिल गुरव यांच्यावर सुपूर्त करण्यात आली आहे. आता आपल्या विभागातील गाव दौरा बैठकांचे नियोजन करण्याची जबाबदारी आता गुरव यांच्यावर राहील, विभागाप्रमाणे बैठका लावून गावातील रिक्त पदानवर नियुक्या करणे गरजेचे आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गोटया कळसुलकर, सतीश गुरव, तेजस राऊत, दीपक कदम, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!