3.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी २१ दिवसांत करा ऑनलाइन नोंदणी

आरोग्य विभागाच्या नोंदणीसाठी पोर्टलही उपलब्ध

कणकवली : जन्म – मृत्यू प्रमाणपत्रासाठी शासनाने नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. जन्म – मृत्यू दाखल्यासाठी आता २१ दिवसांत अर्ज करणे बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्रासाठी ३० दिवसांनंतर अर्ज केल्यास त्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक आहे. या बदलामुळे प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जन्म प्रमाणपत्रासाठी केंद्र शासनाच्या संकेतस्थळाचा वापर केला जातो, तर संकेतस्थाळावर काही बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना प्रमाणपत्रदेखील घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाच्या वेबसाइटवरील बदलानुसार ३० दिवसांनंतरचे ऑनलाइन अर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत. वेबसाइटमधील बदलानंतर अर्ज मंजूर केले जात आहेत.

आरोग्य अधिकारी : जन्म-मृत्यू नोंद २१ दिवसांत करणे बंधनकारक

जन्म व मृत्यूची नोंद घटनेच्या २१ दिवसांत करणे बंधनकारक आहे. जन्म व मृत्यू रुग्णालय अथवा घरी झाल्यास नगर परिषदेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात माहिती दिली, तर तेथून प्रमाणपत्र तयार करून दिले जाते.

ऑनलाइन करा नोंदणी

हे प्रमाणपत्र बनविण्यासाठी राज्य सरकारने एक ऑफिशियल वेबसाइट सुरू केली आहे. ज्यामध्ये भारतातील कोणताही नागरिक जन्म दाखल्यासाठी अर्ज करू शकतो. तसेच, मुलांचा जन्माचा दाखला तुम्ही या वेबसाइटद्वारे मिळवू शकता.

ऑनलाइन स्पेलिंग बदलही करता येणार

फक्त कुटुंबातील व्यक्त्तींनाच जन्म नोंदणी दुरुस्ती अर्ज करता येईल. फक्त आई-वडिलांचे नाव, आडनाव, पत्ता, आधार इत्यादीमध्ये व स्पेलिंग दुरुस्ती करता येणार आहे.

कसा करायचा ऑनलाइन अर्ज 

जन्म आणि मृत्यू नोंदणी वेबसाइटवर लॉगीन करा. साइटवरून जन्म प्रमाणपत्र नोंदणी फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआऊट मिळवा, मुलाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत संबंधित तपशीलांसह फॉर्म योग्यरीत्या भरावा लागतो. तारीख, वेळ, जन्म ठिकाण, पालकांचा ओळखपत्र पुरावा, नर्सिंग होम इत्यादींची पडताळणी केल्यावर प्रमाणपत्र जारी केले जाते.

२१ दिवसांनंतर अर्ज केला तर…

जन्म नोंदणी विलंब झाल्यास, वेगवेगळे शुल्क लागू होऊ शकते. जर एखाद्याने ३० दिवसांनंतर आणि जन्माच्या एका वर्षाच्या आत जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, तर प्राधिकरणाची लेखी परवानगी आणि नोटरीसमोर केलेले प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!