18.4 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

वैभववाडी येथे 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी शिबिर..

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने आयोजन 

नोंदणी शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा : चेअरमन प्रमोद रावराणे यांचे आवाहन 

वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ यांच्या वतीने शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात हे शिबिर पार पडणार आहे. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे जेष्ठ सभासद व वैभववाडी तालुक्यातील ६५ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राहणार आहे.

या योजनेसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, दोन फोटो, 65 वर्ष पूर्ण वयाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी तालुक्यातील जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा व आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!