कणकवली : तालुक्यातील कळसुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसुली नं.१ शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शन हा उपक्रम घेण्यात आला. शालेय जीवनात रानभाज्यांचं आहारा मधील महत्त्व आणि औषधी गुणधर्म काय आहेत याचं ज्ञान मुलांना करून दिल.
या दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचं भविष्यात जतन होण्यासाठी प्रबोधन व्हावं या उद्देशाने शालेय उपक्रम म्हणून त्या’चा प्रदर्शन मांडून प्रदर्शनातील विविध प्रारच्या भाज्यांची असलेली माहिती मुलांना करून देण्यात आली. शाळेतील शिक्षकांकडून विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक करून घेतले जातात. शालेय उपक्रमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राधिका कवडे आणि सहशिक्षक श्री विलीस चोडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गामध्ये प्रदर्शन भरविले त्यामध्ये कुर्डू,पेवगा , एकपान, अळू , तेरा ,भोपळा , सावरशीना, चवळीचा पाला, सुरणाचा पाला , भारंगी , कुड्याच्या शेंगा ,शेवग्याचा पाला, दुधुर्ली ,फागला अशा 17 प्रकारच्या रांभाज्यांचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. प्रीती प्रशांत पारधीये .मुख्याध्यापिका सौ . कवडे मॅडम , सहाय्यक शिक्षक श्री.चोडणेकर सर, स्वयंपाकीदर्शना ठाकूर, श्वेता दळवी ,भाग्यश्री राणे, विना देसाई, रिया दळवी, प्रविणा,रमा मुंडले दीपा दळवी, , मायकल , मठकर, ,शुभ्रा,
कळसुलकर,सुनीता, ,सत्यवान, कानडे पालक उपस्थित होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली . ग्रामस्थ आणि सर्व मातापालक यांनी भाज्या आणून देण्यासाठी खूप मदत केली. मुख्याध्यापिका सौ राधिका कवडे यांनी मुलांना आहाराचे महत्त्व रानभाज्या खाण्याचे फायदे पटवून दिले . शाळेच्या पोषण आहारामध्ये या रानभाज्यांचा वापर आणि प्रत्यक्ष भाजी म्हणून खाण्याचा अनुभव काय असतो हे दाखवून दिलं.