वाहनचालकात भीतीचे वातावरण : योग्य तो बंदोबस्त करा ;ग्रामस्थांची मागणी
सावंतावडी : माजगाव येथे आज भरदिवसा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीत गवा रेड्याचा काळपाने ठाण मांडला. यामुळे इथून प्रवास करणारा वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वन विभागाने गव्या रेड्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
आज दुपारी गोव्याच्या काळपाने दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलाय सुमारे साथ हून अधिक गवारेडा होते. जवळजवळ पाऊण तास रस्त्यालगतच्या शेतात होते वनविभागाने गव्या रेड्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिकांतून होते आहे. दिवसेंदिवस गवेरेडे भर वस्तीत येतात गव्याकडून मनुष्यांवर हल्ल्याचे प्रकार देखील वाढत आहेत
शेती, बागेचे, काजूचे, झाडांचेही मोठ्या प्रमाणात गव्या रेड्यांच्या कळपाकडून नुकसान होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये परिसरात भीतीचे वातावरण पसरल आहे.