2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

आम्रवृक्षाला राखी बांधून सावंतवाडी शहरात चिमुकल्यानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

सावंतवाडी : बहिण भावांच्या पवित्र नात्यांचा सण असलेल्या रक्षाबंधन सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यानी आम्रवृक्षाला राखी बांधून वनचरीप्रति असलेले ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचे काम केले. वृक्षाला बंधू समजून पर्यावरणाचे रक्षण आणि आम्हा सर्वांना जीवदान देण्याचा अभिनव संदेश या निमित्ताने या चिमुकल्यानीं दिला.

सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या तीन वर्षाहून कमी वयाच्या बालकांनी रक्षाबंधनाचा सामुदायिक कार्यक्रम साजरा केला. यावेळी झाडांना राखी बांधून अभिनव उपक्रम साजरा केला झाडांपासून आपणास प्राणवायू मिळतो, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षांनी आम्हाला जीवदान द्यावे यासाठी राखी बांधण्याचा उपक्रम या मुलांनी केला

यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर तसेच अंगणवाडीतील मुले भार्गवी मुंज दूर्वा गावडे प्रिशा भिसे सावी नेवगी योगिता पाटील दिया पेडणेकर

प्रियांशी गुप्ता गार्गी गवळी शुभांगी मेस्त्री अमृता पाटील जिविका कदम तसेच राजवीर दळवी रोहित मुंज गंधार नाईक शौर्य निरतवडेकर मिहान चव्हाण साईश कर्पे जयवंत भाटी रुद्र लाखे गोरक्ष गावडे विराज लाखे स्वराज गोरे गीतांश मुंज तसेच पालक महिला उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!