27.7 C
New York
Monday, July 7, 2025

Buy now

चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत पॅचवर्कची कामे सुरु

कोल्हापूर | यश रुकडीकर : शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियत्यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी चारही विभागीय कार्यालया अंतर्गत मुरुम टाकून रस्ते पॅचवर्क करण्यात येत आहे. यामध्ये आज विभागीय कार्यालय क्र १अंतर्गत देवकर पाणंद, पांडूरंग नगरी, तपोवन मेनरोड, यशवंत लॉन ते कळंबा रोड. विभागीय कार्यालय क्र. २ अंतर्गत जाऊळाचा गणपती ते नागोजी पाटणकर हायस्कूल, पाडळकर मार्केट गंगावेश. विभागीय कार्यालय क्र. ३ अंतर्गत एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, महादेव मंदीर साठमारी चौक. विभागीय कार्यालय क्र. ४ अंतर्गत ताराराणी चौक ते सी.बी.एस स्टँड, काँग्रेस कमिटी मेनरोड, दाभोळकर कॉर्नर ते शाहूपुरी पोलिस स्टेशन ते राजीव गांधी पुतळा मेनरोड परिसरात मुरुम टाकून पॅचवर्क करण्यात आले आहे. सदरचे पॅचवर्क अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी यांनी करुन घेतले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!