वेंगुर्ले : ग्रामपंचायत वजराट आणि श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत वजराट सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये वजराट, आडेली व तेसेबांबार्डे गावातील पुरुष व महिला अश्या एकूण २७ रक्तदात्यानी रक्तदान केले. या रक्तदान कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच श्यामसुंदर पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य दीपिका राणे, नम्रता देसाई तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब, वजराट सोसायटी चे वसंत पेडणेकर, गावप्रमुख सूर्यकांत परब, नंदकिशोर मांजरेकर व अन्य मान्यवर उपस्थिती होते.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते
रक्तदात्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोहर परब, दिगंबर पेडणेकर, शेखर परब, अ. बा. परब, संदीप पेडणेकर, प्रेमानंद भोसले, आनंद परब, निवृत्ती घोणे, बाळकृष्ण परब उपस्थित होते.
रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे डॉ. निखील शिंदे, प्रांजली परब, नेहा परब, कांचन परब, मिलिंद कांबळे, नितीन गावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी आनंद पुराणिक, नंदकिशोर मांजरेकर, बाळकृष्ण सोनसूरकर, भूषण पेडणेकर यांचे आर्थिक सहाय्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी मकरंद गोंधळेकर, नितीन सावंत, प्रवीण गावडे, गौरव मुंजी पूर्वा कांदे यांनी मेहनत घेतली.