20.4 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान ; भाज्यांच्या दारात कमालीची वाढ

कणकवली : पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याने दरात कमालीची वाढ झाली होती. बाजारातील आवकसुद्धा घटली होती. मात्र, श्रावणमास सुरू होत असल्याने सध्या बाजारातील आवक वाढली असून, दरही उतरले असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोच्या दराने शंभरी गाठली होती. सप्टेंबरमध्ये आणखी आवक वाढेल, त्यामुळे दर आणखी खाली येतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. श्रावणामध्ये भाजीपाला, फळांना मागणी वाढते. गणेशोत्सव, पुढे नवरात्र, दसऱ्यापर्यंत खप चांगलाच होतो. नवीन भाज्या विक्रीला आल्या आहेत. येत्या आठवडाभरात स्थानिक भाज्याही विक्रीसाठी येतील. त्यामुळे दर कमी होतील. स्थानिक शेतकरी मुळा, माठ, मेथी, चवळी पालेभाज्यांसह दूधीभोपळा, काकडी, पडवळ, दोडके, तांबडा भोपळा, गवार, भेंडी यांसारख्या भाज्यांची लागवड करीत असल्याने लवकरच विक्रीला येतील. स्थानिक भाज्यांच्या जोडीला टाकळा, भारंगी, कुई, फोडशी, कर्दूली, अळू, अळंबी या रानभाज्या विक्रीला येत असल्याने ग्राहकांना आवडीच्या भाज्या खरेदी करता येत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!