9.2 C
New York
Wednesday, January 7, 2026

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजच्या नूतन कार्यकारिणीने घेतली आ. नितेश राणेंची भेट

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत केली मागणी

लवकरात लवकर तोडगा काढू ; आ. नितेश राणेंचे आश्वासन

कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजचे नूतन अध्यक्ष शशांक आटक यांच्यासह नूतन कार्यकारिणीने कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान आमदार नितेश राणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून जे विद्यार्थी जात पडताळणीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना जात वैधता ( पडताळणी ) प्रमाणपत्र वेळीच मिळाले पाहिजे. असे त्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणे यांनी सदरच्या मागणीवर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज नूतन अध्यक्ष शशांक आटक, सचिव सुजित गंगावणे, कार्यकारणी मधील साबाजी उर्फ बाळा मस्के, दादा ठाकूर, रुपेश गरुड व माजी कार्याध्यक्ष निलेश ठाकूर व वैभव ठाकूर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!