मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ग्रामसेवकांना आदेश
सिंधुदुर्ग : शासनाच्या ५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.त्याचे पालन करावे, त्यानुसार ज्या ग्रामपंचायती कार्यालयामध्ये अद्याप बायोमेट्रिक मशीन खरेदी केलेली नाही त्यांनी तात्काळ खरेदी करावी व तात्काळ बसउन घ्यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिले
ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोलंबली आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. तसेच याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करावी. या मागणीसाठी सावंतवाडी निरवडे येथील सौ श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु केले होते त्याची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी याना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. त्यानुसार ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अद्याप बायोमेट्रिक मशीन खरेदी केलेली नाही त्यांनी तात्काळ खरेदी करून ती बसवून घ्यावी तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिले आहेत.