किरण सामंत, उदय सामंत यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक
राजकीय वर्तुळात अतिशय महत्त्वाची बातमी
कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेचा थोड्याच वेळात फेसला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात याबाबत एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. किरण सामंत, उदय सामंत या बैठकीला उपस्थित राहणार असून थोड्याच वेळात महत्त्वाचा निर्णय देखील रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या जागे संदर्भात होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात या जागेची नावासहित घोषणा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
मात्र दुसरीकडे पाहिलं तर भाजपकडून मंत्री नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित झालेल आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग ची जागा राणेंनीच लढावी अशी इच्छा देखील वरिष्ठांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमधून स्टेटस च्या माध्यमातून आपल्याला रत्नागिरी – सिंधुदुर्ग च्या लोकसभेचा उमेदवार हे मंत्री नारायण राणेच असले पाहिजे, अशा भावना स्टेटस च्या माध्यमातून व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे झालेल्या सर्वे मध्ये देखील मंत्री नारायण राणे यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत नक्की रत्नागिरी – सिंधुदुर्गचा लोकसभेचा उमेदवार कोण ? आणि महायुतीत कोणाला ही जागा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.