श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस येथे होणार पारायण
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी माऊलींच्या कृपेने व सकल संतांच्या कृपाशीर्वादाने मंगळवारी २ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाचे उद्घाटन होणार आहे.६ एप्रिल २०२४ पर्यंत हे पारायण चालणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंडळकर, यांनी केले आहे.
यानिमित्त मंगळवारी २ एप्रिल ला पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ७:३० ते १२ वा. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दु. २:३० ते ५ वा. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायं. हरिपाठ, सायं. ७ ते ९ हरि. कीर्तन तर शनिवार दि. ६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी मंगल, १२:३० ते २ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० ते १०:३० वाजेपर्यंत होणार आहे.
२ एप्रिल २०२४ रोजी सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंडळकर, शिरवल – कणकवली, ३ एप्रिल २०२४ रोजी सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प. विश्वासराव महाराज जामदार, वैभववाडी, ४ एप्रिल २०२४ रोजी हसायं. ७ ते ९ वा. भ. प. रविंद्र महाराज तावडे, डिगस – कुडाळ , ५ एप्रिल २०२४ रोजी सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प. श्रीकृष्ण घाटे, गुरुजी पडेल देवगड, ६ एप्रिल २०२४ रोजी स. १० ते १२ वा. ह.भ.प. विनोद महाराज पाटील, खांबाळे, काल्याचे किर्तन यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
अशी असणार कीर्तन साथ….
ह.भ.प. गुरुनाथ दाभोळकर, ह.भ.प. पंढरीनाथ सावंत, ओरोस, ह.भ.प. कुंदन बांदेकर, ह.भ.प. किरण कुबल, शिरोडा, ह.भप. संतोष मलबारी, ह.भ.प. रमाकांत गायकवाड, फोंडा, श्री. ओमकार मेस्त्री, ओरोस, ह.भ.प. गणपत पांचाळ, वैभववाडी, श्री. मारुती मेस्त्री, श्री. विठ्ठल पांचाळ, जांभवडे, ह.भ.प. जनार्दन डोबकर, हळवल, ह.भ.प. दिपक मढवी, फोंडा, ह.भ.प. राजु साळुंखे, खांबाळे, श्री. अजित बारगुडे, गांजिर्डे, राजापूर, श्री. सोपान तावडे, डिगस, श्री. ज्ञानदेव मेस्त्री, ओरोस, ह.भ.प. पांडुरंग मेस्त्री, सांगवे, ह.भ.प. रमाकांत गवाणकर, घोटगे आणि सर्व टाळकरी .
मृदुंग वादक :
ह.भ.प. विजय सुतार, घोणसरी, श्री. मारुती मेस्त्री, फोंडा, श्री. गजानन राणे, हळवल, श्री. मयुरेश मेस्त्री, ओरोस, श्री. यशवंत रेगडे, निळेली, श्री. प्रकाश डिचोलकर, तेर्से बांबर्डे, श्री. महादेव रेगडे, निळेली, श्री. सिध्देश सावंत, किनळोस, श्री. गौरव परब, ओरोस श्री. भावेश मेस्त्री, ओरोस, श्री. कमलेश मेस्त्री, पोखरण, श्री. विश्वनाथ परब, कुंदे, श्री. सुरेश पवार, खांबाळे, कु. दर्शन गवंडळकर, शिरवल, अशी मृदंग वादक साथ असणार आहे. तर कार्यक्रमास येणाऱ्या वारकऱ्यांनी वारकरी पोशाखात उपस्थित रहावे अशी सूचना देखील करण्यात आली आहे.