आमदार नितेश राणे यांची जनसंपर्क मोहीम
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून आपल्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात करीत आहेत.
आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील विकास कामांचा लेखा जोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडला जाणार असून, जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. या काळात तीन तालुक्यातील २६३ गावांना भेटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून आशिर्वाद घेतले जाणार आहेत.