15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे लोकनायक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात सजारी

कणकवली : लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी दीप प्रज्वलन प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण यावेळी माहिती पटाद्वारे करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या कार्याची माहिती यावेळी महाविद्यालयाच्या कु. तुकाराम नाईक, कु. गौरव मोरे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण दिले.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी कु. वैभव वैरकर, कु.मोहिनी जाधव, कु.चैतन्या परब, कु.विकी राठोड, कु.अपर्णा भैरवकर, कु.गौतमी गावडे, कु.तुलसी शिरसाट, कु.रुतुजा उगवेकर, कु.तुकाराम नाईक, कु.गौरव मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकार सर, डॉ . एम. के. साटम , राष्ट्रीय सेवा योजना संयोजक प्रा. अरविंद कुडतरकर व डॉ.शुभांगी माने , वैभव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी विकी राठोड ,ललित कासवकर, वैभवी गिरकर ,समृध्दी सावंत भोसले व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी संपन्न केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!