0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

सचिन वाझे यांचा बोलविता धनी कोण?, सुषमा अंधारे

बडतर्फ पोलिस अधिकारी असलेले सचिन वाझे यांच्या आरोपामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप सचिन वाझे याने केला होता. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी गंभीर आरोपही केले.

सचिन वाझेंच्या आरोपाचं टायमिंग गंमतीशीर

“मला सचिन वाझे यांच्या आरोपाचं टायमिंग फार गंमतीशीर वाटत आहे. ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसात अनिल देशमुख हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. त्यात ते अजित पवार किंवा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यासाठी त्यांच्यावर काय पद्धतीचा दबाव आणला जात होता, हे सांगत आहेत. त्याबद्दल प्रतिज्ञापत्र द्या, असेही वारंवार त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यात काल अचानक एका कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मै वो हू जो हवाँओ रुख बदल देता हूँ…! असे वक्तव्य केले. मग त्यांना जे हवाँओ रुख बदलायचे होते, ते काय सचिन वाझेच्या माध्यमातून बदलायचे होते”, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

फडणवीसांना समोर येऊन बोलण्याची हिंमत नाही”

“विधानसभा निवडणुकीपूर्वी फेक नरेटिव्हचे केंद्र असणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी केलेला हा अत्यंत बालिश प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना समोरासमोर येऊन बोलण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते मागे राहून नितेश राणेंसारख्यांना पुढे करतात. त्यांना जेवढी सुपारी दिली जाते, तेवढंच ते वाजवतात”, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

सचिन वाझे काय म्हणाले?

“जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझे यांनी काल ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!