25.8 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

कणकवली पोलिसांनी CEIR पोर्टल द्वारे १२ गहाळ मोबाईल केले हस्तगत

पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांची दमदार कामगिरी

आतापर्यंत ६९ मोबाईल विविध राज्यांमधून केले हस्तगत

कणकवली : कणकवली पोलिसांनी गहाळ झालेले आतापर्यंत गेल्या १० महिन्यात ६९ मोबाईल विविध राज्यांमधून हस्तगत केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांनी CEIR या पोर्टल द्वारे जुलै महिन्यात १२ मोबाईल हस्तगत करीत शुक्रवारी नागरिकांना स्वाधीन केले. या निमित्ताने पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांची दमदार कामगिरी बजावली आहे.

ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते, त्यांना पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे हस्ते मोबाईल परत करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, प्रशांत कासले व नागरिक उपस्थित होते. हे गहाळ मोबाईल बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक व महाराष्ट्र या विविध भागातून हस्तगत करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यासाठी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!