9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला झालेल्या दंडाबाबत शिवसेना आक्रमक

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात ६ ऑगस्ट रोजी शिवसेना करणार आंदोलन

आमदार वैभव नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. मंगळवार दि. ०६/०८/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे हे आंदोलन होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!