0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

४३ घरामध्ये सापडल्या डेंग्युच्या आळ्या ; महापालिकेच्यावतीने २२७४ घरांचे आरोग्य सर्व्हेक्षण

कोल्हापूर | यश रुकडीकर : महानगरपालिकेच्या आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेमध्ये ४३ घरामध्ये डेंग्युच्या आळया आढळून आल्या. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी २२७४ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात १६ तापाचे रुग्ण आढळून आले. यामधील ३ नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी सीपीआरमधील लॅबकडे पाठविण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई मंदिर, शिवाजी पेठ, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहुपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, दौलत नगर, जागृतीनगर, प्रतिभा नगर, सम्राट नगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, जुना बुधवार पेठ, रंकाळा स्टँड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, ब्रम्हपुरी, मस्कृती तलाव, कलकुटकी गल्ली, कावळा नाका, माकडवाला वसाहत, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, मुक्त सैनिक वसाहत, भोसलेवाडी, बापट कॅम्प, महालक्ष्मीनगर, गोविंद पार्क, सपकाळ गल्ली, घरकुल योजना, सदरबाजार, कासार गल्ली, घाडगे कॉलनी, सोमवार पेठ, नागाळा पार्क, जुना बुधवार पेठ, रमणमळा, सिद्धार्थनगर, राज बक्ष दर्गा, गंजी गल्ली, शनिवार पेठ, उत्तर शाहूपुरी, घिसाड गल्ली, नवीन पॅलेस, पोवरमळा, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, दादू चौगुले नगर, बापु रामनगर, जन दत्तनगर, साळोखेनगर, आपटेनगर, पाचगाव रोड, जिवबा नाना जाधव पार्क, देवकर पाणंद, नाळे कॉलनी या परिसरात करण्यात आले. या परिसरात आशा स्वयंसेविकेमार्फत डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!