इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई ; ७० लाखाचा मुद्देमाल जप्त
बांदा : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल ७०,१३, २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
नोशाद खान (वय २४) हरियाणा व विष्णू जाट (वय २५) राजस्थान असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.