10.4 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

मोबाईल लॉक काढण्यासाठी आला संशयित युवक | आधार कार्ड विचारताच ठोकली धूम

मोबाईलचे रिपेरिंग करणारे परेश आचरेकर यांनी दाखवला प्रामाणिकपणा

मोबाईल आणि मोटरसायकल केली पोलिसांच्या स्वाधीन

कणकवली : बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स येथील भालचंद्र मोबाईल रिपेअर सेंटर येथे एक सुमारे २७ वर्षीय युवक मोबाईलचे लॉक काढण्यासाठी आला होता. मात्र मोबाईल रिपेअर सेंटरचे मालक परेश आचरेकर यांनी त्या युवकाकडे आधार कार्ड विचारले असता त्या युवकाने मोबाईल दुकानातच सोडून तेथून पळ काढली. तसेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपली मोटर सायकलही त्या ठिकाणी टाकून धूम ठोकली. त्यामुळे परेश आचरेकर यांना त्या युवकाचा संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांना दिली. तसेच त्या युवकांनी दुकानात सोडलेला मोबाईल व मोटरसायकल परेश आचरेकर यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली.

परेश आचरेकर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!