9.3 C
New York
Friday, March 20, 2026

Buy now

धान्य वितरणासाठी मुदतवाढ द्या | अण्णा कोदे यांची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी

कणकवली : जुलै महिन्यात सर्व्हर प्रॉब्लेम मुळे रेशन धान्य वितरणात अडचणी आल्या. त्यानंतर 30 जुलै रोजी प्रशासनाने ऑफलाईन धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन दिवसांत जुलै महिन्यातील धान्य वितरित करणे अशक्य आहे. तरी जुलै महिन्यातील धान्य वितरित करण्यात मुदतवाढ मिळावी अशी आग्रही मागणी भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी तहसीलदार देशपांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, हरकुळ बुद्रुक उपसरपंच सर्वेश दळवी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, समीर प्रभूगावकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!