6.6 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प ; ग्राहकांना नाहक हेलपाटे मारून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय

आण्णा कोदे यांनी निवेदनावद्वारे वेधले तहसीलदारांचे लक्ष

कणकवली : शहरासहित तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असून आपण याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली आहे.

 

याबाबत निवेदन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की कणकवली शहर व आजूबाजूच्या गावातील गॅस धारकांना गेल्या काही कालावधीपासून सिलेंडरचा पुरवठा अनियमित आहे. अनेक ग्राहक गॅस एजन्सीकडे जाऊन माघारी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे हाल होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला असून आपण याप्रकरणी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. तसेच सिलेंडर साठी नंबर लावल्यानंतर सिलेंडर न मिळाल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना वाहनाचे भाडे एजन्सी कडून मिळण्याची तरतूद असल्याचे समजते. याबाबत आपण उचित कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागात वितरित करण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या वेळी अतिरिक्त 50 रुपयांची आकारणी केली जात असल्याचाही तक्रारी प्राप्त होत असून याबाबत आपण उचित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी वागदे सरपंच संदीप सावंत,लक्ष्मण सावंत साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम समीर प्रभू गावकर संदेश सावंत उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!