कुडाळ : दोन दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील दोन सख्या भावांचा राधानगरी येथे अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. माजी खासदार निलेश राणे यांना घटनेची माहितीइ मिळताच तात्काळ माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी त्या दोन्ही भावांचे वडील चंद्रकांत राणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देखील निलेश राणे यांनी केली. तसेच सदरच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी. यासाठी आपण राधानगरी पोलीस निरीक्षकांची चर्चा करणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहे.