नांदगाव- तोंडवली परिसरातील घटना
नांदगाव/ कणकवली : नांदगाव परिसरात टॉवल टी शर्ट परिधान केलेल्या एका चोराने दहशत माजवली असून काल ७:३० च्या सुमारास एकाच्या घरात घूसल्यावर घरमालकाने प्रतिकार केला असता हातातील कडे डोक्यात मारून जखमी केले.या संशयिताचे नाव दिनेश कुमार असे आहे.लगतचे एक बंद घरही फोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल दिवसभर एक संशयित तरूण तोंडवली भागात फिरत होता.सायंकाळी ७:३० च्या दरम्यान हा तोंडवली बोभाटेवाडी येथील विनोद बोभाटे यांच्या मागच्या दरवाजाने आत घुसला.घरात घुसल्यावर घरमालक विनोदने प्रतिकार केला असता त्याला मारायला सुरुवात केल्यावर दोघांमध्ये हातापाई होऊन घरमालक विनोदाच्या डोक्यावर हातातील कड्याने प्रहार करून जखमी केले.बायाका मुलांनी आरडा ओरड केल्यावर हा संशयित टावेल आणि टी शर्ट परिधान केलेला संशयित चोरटा पसार झाला. आरडा ओरड ऐकून परिसरातील शेजारी जमा झाले.शोधाशोध केली मात्र ठावठिकाणा लागला नाही.यावेळी शेजारील एक बंद घर फोडल्याचे दिसून आले.याची पाहणी केली असता याने त्याठिकाणी आंघोळ करून त्याच घरातील टॉवल गुंडाळून गेल्याचा अंदाज आहे.
आधार कार्ड मिळाले
रात्री ११:०० वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती यावेळी हा संशयित नांदगाव वाशिम वाडी येथे सुध्दा गेल्याचे समजते.यावेळी या व्यक्तीचे आधारकार्ड पडलेले ग्रामस्थांना मिळाले असून दिपक कुमार पैंकरा असे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवाय या भागात सध्या विजेचा खेळ खंडोबा सुरू असल्याने सर्वत्र असलेल्या अंधाराचा फायदा या चोरट्यांना होत आहे तर लोकांचा जीवाला अशांमुळे धोका संभवतो आहे.