निवड झालेल्या ८ उमेदवारांची चौकशी सुरु
पुणे : यूपीएससीनंतर आता एमपीएससीवर पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आठ विद्यार्थ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर आता आठही उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात मॅटने चौकशी सुरु केली आहे.
एमपीएससीमार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आलेल्या आठ उमेदवारांनी त्यांची दिव्यांग प्रमाणपत्र कुठून मिळवली, याविषयी माहिती समोर आली आहे.
1. मेडिकल अथॉरिटी कॉलेज, कोल्हापूर
2. आर सी एस एम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
3. मेडिकल अथॉरिटी , नाशिक
4. मेडिकल ऑथॉरिटी, यवतमाळ
5. मेडिकल ऑथॉरिटी,पुणे
6. डिस्ट्रिक्ट सिविल हॉस्पिटल, लातूर
7.आर सी एस एम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
8. मेडिकल ऑथॉरिटी, ठाणे
मॅटच्या आदेशानुसार ५ ऑगस्ट ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करून मॅट समोर मांडावी लागणार आहे. मॅटच्या आदेशानुसार उमेदवारांनी त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करून सत्य मांडावे लागणार आहे. या उमेदवारांनी प्रमाणपत्रांची पडताळणी न केल्यास त्यांची निवड रद्द होणार आहे.
तक्रारीतील सर्व उमेदवारांना विभागीय आरोग्य उपसंचालक किंवा आधिष्ठाता यांच्यासमोर उपस्थित राहावं लागणार आहे. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यायची आहे.