महिलांच्या बँक खात्यावरची रक्कम होतेय गायब
पुणे : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट सुळसुळाट वाढला आहे. त्यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पुण्यात हॅकर्स कडून महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी फ्रॉड कॉल्स येत आहेत. फोन करून हॅकर्स महिलांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे.
फोन करून हॅकर्स महिलांचं बँक खाते करत आहेत. यातून महिलांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.पुण्यातील येरवडा भागात अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फोन आले होते. त्यानंतर महिलांच्या बँकेतील रक्कम गायब केली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्ताकडे तक्रार केली आहे.